स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णु नगर प्राथमिक शाळेचा जानेवारी महिना ठरला विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा

Source :    Date :19-Feb-2020

       *अभिनंदन*अभिनंदन*अभिनंदन*

       राष्ट्रीय शिक्षण संस्था स

 
               राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर ,विष्णु नगर प्राथमिक शाळेचा जानेवारी महिना ठरला विद्यार्थ्यांचा कौतुकाचा सोहळा.

      मंगळवार दि. २८/०१/२०२० रोजी थिएटर मुव्हमेंट ,कटक ओरिसा येथे आयोजित केलेल्या " ग्लोबल थिएटर फेस्टिवल " मध्ये नृत्य /नाट्य/अभिनय इ. विविध कलागुण दर्शन घडवणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत आमच्या शाळेतील इ . १ली ते ४ थी च्या बालचमूने सादर केलेल्या चिमटा या बालनाटयास प्रथम क्रमांक मिळाला आहे. तसेच इ. ५ वी ते ७ वी च्या बालचमूने तेथे सादर केलेल्या आम्ही ई तुकडीचे मानकरी या बालनाटयास विशेष चेअरमन अवॉर्ड द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे .

     सहभागी विद्यार्थ्यांमधील इ . १ ली ते ४ थी गटातून गजेंद्र संजय साठे यास वैयक्तिक अभिनयात प्रथम क्रमांक तर श्रुतिका समीर अभ्यंकर हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.

       इ . ५ वी ते ७ वी च्या गटातून रुद्रा संतोष कदम हिने एकपात्री अभिनय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.

     या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी तसेच ह्या विद्यार्थ्यांच्या नाटकाचे दिग्दर्शन करण्यापासून ते विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक ओरिसाला नेवून आणण्या पर्यंतची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणारे शिक्षक वृंद श्री. मंगेश पेडामकर सौ.राजश्री शिंगाडे ,सौ. मेघा कांबळी .श्री दत्ताराम मोंढे आणि ह्या सर्वाना सर्वतोपरी मदत करणारे पालक , या सर्वांचे पालकत्व सांभाळलेल्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा बेडसे आणि कल्पवृक्षाप्रमाणे सावली देणारी आमची राष्ट्रीय शिक्षण संस्था यांचे हार्दिक अभिनंदन.


राष्ट्रीय शिक्षण संस्था स

राष्ट्रीय शिक्षण संस्था स
 
राष्ट्रीय शिक्षण संस्था स