स्वामी विवेकानंद शाळेतील शिक्षिका सौ. डोईफोडे बाई सेवानिवृत्त

Source :    Date :19-Jul-2020

स्वामी विवेकानंद शाळेतील शिक्षिका सौ. डोईफोडे बाई सेवानिवृत्त
1_1  H x W: 0 x

         राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, विष्णुनगर माध्यमिक शाळेच्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका माननीय सौ. वर्षा अनिल डोईफोडे यांचा शुभेच्छा समारंभ नुकताच गुगल मीट वर ऑनलाईन पार पडला.

         कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्वजण एकत्र येणे शक्य नसल्याने ऑनलाईन सेवानिवृत्ती शुभेच्छा समारंभाचे आयोजन केले गेले. राष्ट्रीय शिक्षण संस्थेचा,शाळेचा ऑनलाईन पहिलाच कार्यक्रम अतिशय सुनियोजितपणे पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉ. श्री सुभाष वाघमारे सर, कार्यवाह माननीय डॉ. श्री. दीपकजी कुलकर्णी , शालेय समितीचे अध्यक्ष माननीय डॉ. श्री धर्माधिकारी सर, संस्था सदस्य, विष्णुनगर शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री. रायसिंग सर, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती बेडसे बाई ,पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख माननीय सौ.मुरादे बाई, संस्थेच्या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, उत्सवमूर्ती सौ. डोईफोडे बाई व त्यांचे कुटुंबीय, हितचिंतक असे मिळून जवळजवळ साठ लोक उपस्थित होते.

           प्रथेप्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने होते. परंतु या कार्यक्रमात दिपप्रज्वलन व्हिडिओ मार्फत करण्यात आले. सौ.दातार ताईंनी ईशस्तवन सादर केले. शाळेच्या वतीने सौ.रानडे बाई यांनी माननीय सौ. डोईफोडे बाई व त्यांच्या कुटुंबीयांचे त्यांच्या घरी उपस्थित राहून पुष्पगुच्छ देऊन प्रत्यक्ष स्वागत केले.

          शालेय समिती अध्यक्ष माननीय डॉ. श्री धर्माधिकारी सर व संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉ.श्री. वाघमारे सर यांनी भाषणातून बाईंना शुभेच्छा दिल्या. तसेच अरुणोदय शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री. पाटील सर यांनी प्रातिनिधिक स्वरूपात शुभेच्छा दिल्या . पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी दिलेल्या शुभेच्छांची व्हिडीओ क्लिप कार्यक्रमादरम्यान दाखवण्यात आली.

          माननीय सौ.डोईफोडे बाई यांनी आपल्या मनोगतामध्ये सेवा काळातील अनेक आठवणींच्या क्षणांना उजाळा दिला. याच बरोबर स्वतःच्या काव्य रचनेतून शिक्षकांचे वर्णन केले.

            या कार्यक्रमाचे संपूर्ण स्वरूप हेडगेवार सभागृहातील कार्यक्रमा सारखेच होते. नेहमीच्या प्रथेप्रमाणे कार्यक्रमाची सांगता सौ.दातार ताईंनी म्हटलेल्या संपूर्ण वंदेमातरम् ने झाली.

             राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे कार्यवाह माननीय डॉ. श्री. दीपकजी कुलकर्णी यांची कल्पना , विष्णुनगर शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री.रायसिंग सर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने प्रत्यक्षात कार्यक्रमाच्या रुपाने साकार केली. विष्णुनगर शाळेतील सर्व शिक्षक दूर असून सुद्धा एकत्र आहेत हे एकंदर कार्यक्रमाच्या आयोजन व नियोजनातून सिद्ध होत होते.

            पूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. केतकी देशपांडे व सौ.रेखा गढरी यांनी केले. तसेच कार्यक्रमात दाखवलेल्या व्हिडिओ क्लिप सौ.अर्चना मराठे, सौ. शर्मीला मुठे व सौ.केतकी देशपांडे यांनी तयार केल्या होत्या.या व्हर्चुअल कार्यक्रमातल्या सर्व तांत्रिक बाबी श्री.सपकाळे सर यांनी हाताळल्या.

           करोना चा काळ असूनही व्हर्च्युअल माध्यमाचा वापर करून हा कार्यक्रम अतिशय उत्तम रीतीने साकार झाला. एकंदरीतच हा अप्रतिम कार्यक्रम ऐतिहासिकच झाला. भूतो भविष्यती’अशी प्रचिती आली.
1_1  H x W: 0 x

 
 
 
 
 
 नलाईन संपूर्ण कार्यक्रम खाली व्हिडिओ मध्ये आहे.