तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शक्य झाले...कोरोनाचा अंधकार मिटविण्यास दीप उजळविले

Source :    Date :22-Jul-2020

 

राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर (प्राथमिक)
 

DEEP PUJAN_1  H 

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शक्य झाले...

कोरोनाचा अंधकार मिटविण्यास दीप उजळविले...

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर प्राथमिक ही शाळा, प्रत्यक्षात जरी शाळा सुरू झाली नसली तरी सर्व विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने शालेय उपक्रमांची परंपरा शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील पहिला उपक्रम गुरुपौर्णिमेपासून नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने जोपासत आहे.

सोमवार दि.२० जुलै,२०२० रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा बेडसे बाई यांच्या नियोजनाप्रमाणे व सर्व वर्गशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता पहिली ते सातवीच्या वर्गांतून आषाढातील "दीप अमावस्या" साजरी करण्यात आली.
इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी दिव्यांची विविध चित्रे वहीमध्ये रेखाटली. घरी राहून आईला दिव्यांच्या मांडणीसाठी व पूजेसाठी मदत केली व सहकुटुंबांने प्रार्थना म्हटली.
इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः दिवे स्वच्छ करून ते प्रज्वलित केले, नाविन्यपूर्ण रुपात त्यांची मांडणी केली, दिव्यांची आरास केली, दिव्यांभोवती सुंदर रांगोळी रेखाटली, पाना फुलांची सजावट केली, तर काही विद्यार्थ्यांनी स्वतः च्या आवाजात मंत्र ,प्रार्थना स्वरबद्ध केली.
विद्यार्थ्यांनी आपल्या घरी राहून ह्या उपक्रमाची सर्व क्षणचित्रे भ्रमणध्वनी मधून Whatsapp च्या माध्यमातून प्रसारित केली.
आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्व आहे. प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते. घरातील इडा पिडा टाळून, अज्ञान, रोगराई दूर करून, ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी अशी मान्यता आहे.
तिमिरातून तेजाकडे वाटचाल करण्याचे दीप हे एक महत्त्वाचे माध्यम आहे, सकारात्मकतेचे प्रतीक आहे. हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कोरोनाच्या तिमिरातून बाहेर पडण्यासाठी, सकारात्मकता पसरवण्यासाठी विद्यार्थ्यांनी दीप लावून   "दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तम।  गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भवः।।"  ही प्रार्थना म्हटली. आम्हाला विश्वास आहे की चिमुकल्यांची ही प्रार्थना परमेश्वरापर्यंत नक्की पोहोचली असेल.

 दीपःज्योती नमोऽस्तुते


दीपपूजन _1  H x      दीपपूजन _1  H x