९ ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त क्रांतिकारकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा उपक्रमस्वतंत्रते भगवती

Source :    Date :12-Aug-2020

राष्ट्रीय शिक्षण संस्था, डोंबिवली
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, विष्णुनगर (प्राथमिक)
 ९ ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त क्रांतिकारकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा उपक्रम
स्वतंत्रते भगवती
स्वतंत्रते भगवती_1 &
        अजून दोन वर्षांनी साजरा करू.... आपण सर्वच भारतवासी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव...
त्यासाठी दोनशे वर्षे चाललेल्या स्वातंत्र्ययुद्धाचे आणि आमच्या स्वातंत्र्याच्या पाठीशी असलेल्या
अपार त्यागाचे, बलिदानाचे स्मरण उद्याच्या जबाबदार नागरिकांच्या मनात असावे...
               
 'उभा जन्म देशसेवेसाठी वाहीन' असा पण करून प्राण अर्पणार्‍या
             हुतात्म्यांच्या हौतात्म्याची तीक्ष्णता...

ह्या सगळ्याचीच जाण शालेय विद्यार्थ्यांच्या मनात जागविण्याचा एक चांगला प्रयत्न म्हणजे प्रस्तुतचा हा उपक्रम.... स्वतंत्रते भगवती
   आमच्या शाळेच्या कर्तव्यतत्पर मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा बेडसे, कर्तव्याला कृतिशीलतेची जोड देणारा शिक्षकवृंद, आणि हरहुन्नरी विद्यार्थी-पालक वर्ग ह्याची आदर्श चौकट ह्या उपक्रमाला लाभली.
  आजच्या ह्या उपक्रमाला विद्यार्थ्यांना खुले व्यासपीठ करून देण्यात आले , विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांची नावे लिहिणे, एखाद्या क्रांति कारकविषयी माहिती लिहिणे,माहिती सांगणे, त्यांचे चित्र रेखाटणे, गीत सादर करणे इ. ह्या उपक्रमासाठी इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनी आपले व्हिडिओ पाठविले. उपक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांचे शाळेकडून खूप खूप कौतुक...आणि पालकांनी केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद
  भारताच्या वैभवसंपन्न इतिहासाचे, परंपरांचे, लोकविलक्षण मानवधनाचे, आदर्श संस्कृतीचे संस्करण आमच्या ह्या विद्यार्थ्यांच्या मनाच्या कोवळ्या मातीत व्हावे हिच स्वतंत्रते भगवती देवीच्या चरणांशी प्रार्थना....

हे मातृभू
तुझ्याच गुणकीर्तना आम्हा शब्द दे
तुझे स्तवन गावया आम्हा सूर दे
पडो तुझ्या चरणि देह हा लाखदा
तुझ्याच उदरी परी पुन्हा जन्म दे

।। जय हिंद... जय महाराष्ट्र...।।