१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त इनरव्हील क्लब ऑफ डोबिवली आयोजित कविता गायन व वक्तृत्व स्पर्धां मध्ये शालेय विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश...

Source :    Date :25-Aug-2020
 
 
 
इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली
 
 शनिवार 
दिनांक १५ ऑगस्ट,२०२०.
 
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच दि.१४ ऑगस्ट, २०२० रोजी इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली ने मराठी ,हिंदी आणि इंग्रजी भाषेत इ.५ वी ते ७ वी आणि ८ वी ते १० वी अशा दोन गटात ऑनलाईन कविता गायन आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
सदर कार्यक्रमाचा पारितोषिक वितरण सोहळा दि.१५ ऑगस्ट,  २०२० रोजी सायं.५ वा. झूम ॲप वर ऑनलाईन झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डोंबिवलीचे नामवंत डॉ. सुधीर कुलकर्णी हे होते.या कार्यक्रमात कविता गायन व वक्तृत्व स्पर्धेत *स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, विष्णुनगर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी *इ.५ वी ते ७ वी* च्या गटात ११२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उल्लेखनीय अशी कामगिरी केली.

विद्यार्थी कविता गायन व वक्तृत्व स्पर्धेत प्रत्येकी पहिल्या दहा म्हणजेच TopTenमध्ये २० विद्यार्थ्यांपैकी ६ विद्यार्थी आपल्या शाळेचे होते. त्यापैकी खालील विद्यार्थी अंतिम निकालात यशस्वी झाले.

कविता गायन
(मराठी)
कु.मानसी सुरेश विनेरकर (इ.७ वी/ब):
द्वितीय क्रमांक
 
कविता गायन
(हिंदी)
कु. पूर्वेश तेजस लिमये (इ.५ वी/ब)
द्वितीय क्रमांक

वक्तृत्व स्पर्धा**
कु. हर्षल संतोष खेडेकर (इ.६ वी/ब)
पाचवा क्रमांक
 
कु.नेहा महेश जोशी (इ.७ वी/अ)
चौथा क्रमांक

सदर स्पर्धेबाबत आमच्या राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे कार्यवाह डॉक्टर  श्री.दीपक कुलकर्णी आणि शालेय समिती सदस्य श्री.रवींद्र जोशी ह्यांनी माहिती दिली.ह्या स्पर्धेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा बेडसे ह्यांनी व सर्व वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रोत्साहित केले. या यशाचे खरे श्रेय जाते ते पालकांना! कारण सध्याच्या या कठीण काळातही पालकांनी विद्यार्थ्यांना सहभागी करून त्यांचे व्हिडिओ तयार करून घेतले व ते वेळेत ऑनलाईन पाठविले अशी दुहेरी भूमिका निभावल्यामुळेच हे शक्य झाले.त्यामुळे शाळेतर्फे पालकांचे मनापासून धन्यवाद...