राष्ट्रीय शिक्षण संस्था ,डोंबिवली स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, विष्णुनगर प्राथ आयोजित शिक्षकदिन दि ५ सप्टेंबर २०२०

Source :    Date :13-Sep-2020
 
राष्ट्रीय शिक्षण संस्था ,डोंबिवली संचालित
                                                 स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, विष्णुनगर (प्राथ )
   शिक्षकदिन   
                                                                                                                                                          ५ सप्टेंबर २०२०
 
  डॅा.सर्वपल्ली राधाकृष्ण_
येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने घडवतो तो खरा शिक्षक.”
- डॅा.सर्वपल्ली राधाकृष्णन
           ५ सप्टेंबर हा दिवस भारताचे दुसरे राष्ट्रपती डॅा.सर्वपल्ली राधाकृष्णन' यांचा जन्मदिवस.
  हा दिवस आपण दरवर्षी शिक्षक दिन म्हणून  साजरा करीत असतो. ह्यादिनानिमित्त या वर्षी संस्थेतर्फे सर्व शिक्षकांसाठी ऑनलाइन ह्या आधुनिक तंत्रज्ञानामार्फत उद् बोधन वर्ग घेण्यात आला.
  शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा बेडसे ह्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सर्व सहकारीशिक्षक ह्यांनी पूर्वनियोजन केल्याप्रमाणे व त्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिका अतंर्गत सी.आर.सी केंद्रातर्फे आलेल्या परिपत्रकाप्रमाणे “Thank A teacher” या मोहिमे अंतर्गत विदयार्थ्यांच्या अंगभतू कौशल्यांना वाव देण्यासाठी विविध कलात्मक व प्रेरणात्मक स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले .
इ. १ली ते ४ थी : विद्यार्थ्यांनी आकर्षक शुभेच्छापत्रके तयार करणे 
त्यावर शिक्षकांप्रती आदरयुक्त संदेश लेखन करणे.ह्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर भेटकार्ड तयार करून त्या मध्ये लॉकडाउन च्या काळातील आपल्या शाळा व शिक्षकांविषयीच्या भावना व्यक्त केल्या व त्या व्हाट्सअप च्या माध्यमातनू आपल्या गुरूंपर्यत पाठवल्या.
इ. ५ वी :"शाळा व शिक्षण "ह्या विषयावर आधारित घोषवाक्य तयार करणे.
इ . ६वी व ७ वी : काव्य रचना :शाळा व शिक्षण विषयांवर आधारित काव्य रचणे.
इ . ६वी व ७ वी : पोस्टर्स तयार करणे : "कोरोना ' ह्या विषयावर आधारित पोस्टर्स तयार करणे .
इ .  ५ वी  ते ७वी: निबंध स्पर्धा : " कोरोना काळात बदललेली माझी जीवनशैली या विषयावर आधारित निबंध लिहिणे . लॉकडाउन मुळे प्रत्येकाच्या जीवनशैलीवर परिणाम झाले आहेत .यामध्ये माणसाने नैसर्गिक आपत्ती व वैश्विक महामारी ह्याचा सामना करत कशा पद्धतीने माणुसकी,सहकार्य ,संवेदनशीलता,शिस्त,संयम व स्वखर्चावर निर्बंध घालत आत्मनिर्भर बनण्यासाठी सुरू के लेले प्रयत्न आणि विशेष म्हणजे जेव्हा शाळा होती तेव्हाशाळेत येण्याचा कंटाळा करणारी मुले शाळेच्या भेटीसाठी आतुर झाली आहेत हे सारे मुद्दे विद्यार्थ्यांच्या ह्या निबंधातून प्रकर्षाने जाणवल्या.
पालक वर्ग : शैक्षणिक रांगोळी काढणे .
यामध्ये पालकांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला .पालकांनीआपल्या रांगोळीच्या माध्यमातून स्त्री शिक्षण, ऑन लाईन शिक्षण, शिक्षणाची संधी,शिक्षणाचे महत्त्व इ .विषयांची मांडणीअतिशय सुंदररित्या केली.
मनोगत व्यक्त करणे : "माझे प्रेरक शिक्षक " या विषयांतर्गत पालकांना आतापर्यत त्यांच्या आयुष्यात आलेले आणि ज्या गुरूंमुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली अशा शिक्षकांविषयी आदर ,कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी ह्या मनोगतातून मिळाली .
हे सर्व उपक्रम व्हाट्स गृप च्या माध्यमातनू राबवण्यात आले . ह्या कठीण काळात ह्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन सर्व विद्यार्थीआणि पालकांनी सकारात्मकतेचे दर्शन घडविले ह्या सहभागाबद्दल शाळासमिती सदस्य,संस्था पदाधिकारी ,शिक्षण विभागाचे पदाधिकारी ह्यांचे कडून विद्यार्थी व पालकांचे कौतुक होत आहे . ह्या उपक्रमाचे सादरीकरण पुढीलप्रमाणे :