चैतन्याच्या लाटेवरले पक्षी आम्ही मुले नव्या दिसाची पहाट अमुच्या पंखावरती फुले

Source :    Date :07-Jan-2021


photo_1  H x W:
       It is possible to fly without motors but not without knowledge and skill.

इंग्रजीतील या उक्तीनुसार आपली राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्या मंदिर विष्णुनगर प्राथमिक ही शाळा विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहित करीत असते

विद्यार्थ्यांच्या छंदाला प्रोत्साहनाची जोड देऊन नवनिर्मिती करण्यासाठी प्रेरित करीत असते यातूनच विद्यार्थ्यांना स्वनिर्मितीचा आनंद तर मिळतोच पण साहित्याची जुळवाजुळव करताना सहकार्य वृत्ती ठेवणे, उपक्रम मांडणी योग्य रीतीने होण्यासाठी कौशल्य प्राप्त करणे निवेदनातून वक्तृत्व कला अभ्यासणे, आत्मविश्वास वाढवणेइत्यादी कलागुणांना विकसित करण्याची संधी मिळते.                                                                     
याच भावना पुढील ओळीतून व्यक्त होतात
                                          चैतन्याच्या लाटेवरले पक्षी आम्ही मुले
 नव्या दिसाची पहाट अमुच्या पंखावरती फुले
माननीय मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा बेडसे यांच्या मार्गदर्शनाखालीमंगळवार दि 29 डिसेंबर 2020 रोजी इयत्ता पहिली ते चौथी साठी अशाच अभिनव उपक्रमांची मांडणी सर्व शिक्षकांनी आयोजित केली 
 
 इयत्ता १ ली  साठी कोलाज काम तसेच कागदी डिश पासून पिशवी तयार करणे.

इयत्ता 2री साठी काडेपेटीच्या रिकाम्या खोक्यापासून विविध वस्तू तयार करणे.

या उपक्रमात विद्यार्थ्यांनी वाळलेली पाने ,फुले इत्यादींचा कल्पकतेने वापर करून कलाकृती निर्माण केली.घोटीव कागदापासून होडी व पेन स्टँड बनवले.

इयत्ता तिसरी व चौथी तील मुलांच्या अंगी वैज्ञानिक दृष्टिकोनाची रुजवणूक लहानपणापासूनच व्हावी यासाठी विज्ञान प्रकल्प मांडणीचे आयोजन केले गेले

व्याधींचा चूकविण्यास हल्ला,वास्तुशांती विण टिकण्या इमला

विज्ञानाचे गमक जाणू या, अवकाशाच्या नवशोधाला

वाहतूक -दळणवळण, पूजेचे अपारंपारिक स्त्रोत, कचरा -व्यवस्थापन ,प्रदूषण नियंत्रण स्मार्ट शहर अशा विविध प्रकल्पांना आपल्या ओघवत्या निवेदन शैलीतून शास्त्रीय तत्व सांगून मूर्त स्वरूप दिले.
पालकांकडून संकलित केले गेलेले वरील कलाकृती व विज्ञान प्रकल्पांचे व्हिडिओंची एकत्रित गुंफण सौ वैशाली सरोदे(इ.१ली व २ री) ,सौ राजश्री शिंगाडे ( इ.३री व ४ थी) यांनी केले. सदर उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद ,विद्यार्थी व पालक प्रयत्नशील राहिले म्हणूनच शाळेने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे सादरीकरण व्हिडिओद्वारे करण्याचे ठरवले आहे.

संस्था पदाधिकारी शाळा समिती सदस्य यांनीही सदर उपक्रमास कौतुकाची थाप देऊन विद्यार्थी व पालक यांची प्रशंसा केली.