आभासी प्रणालीच्या माध्यमातून जागतिक महिला दिन साजरा.

Source :    Date :14-Mar-2021
 
womens day_1  H
आई, बहीण, मुलगी, बायको अशा अनेक जबाबदाऱ्या अगदी सहजतेने निभावणारी ती... स्त्री.
ती एक मैत्रीण म्हणून तुम्हाला समजावते
तर कधी बहीण म्हणून रागवते.
कधी आईच्या रूपाने देवाचे दर्शनही घडवते
तर कधी मुलगी म्हणून आई एवढेच प्रेम देते.
प्रत्येक नाते ती निष्पाप मनाने निभावते.
 
महिलांनी स्वत:च्या हक्कांसाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी जागतिक महिला दिन आठ मार्च रोजी साजरा केला जातो . स्त्री शक्तीच्या लढ्याच्या सन्मानार्थ सोमवार दि.०८/०३/२०२१ रोजी जागतिक महिला दिन आमच्या शाळेत आभासी प्रणालीच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.
 
सोमवार दि. २२/०२/२०२१ ते सोमवार दि.८/०३/२०२१ या कालावधीत जागतिक महिला दिन पंधरवडा साजरा करण्याचे शासनस्तरावरील पत्रकान्वये कृतीकार्यक्रम निश्चित करण्यात आला होता . विविध क्षेत्रांत आपल्या भरीव कामगिरीने ठसा उमटवलेल्या कर्तृत्ववान महिलांची ओळख व त्यांच्या उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्याची माहिती विद्यार्थ्यांना व समाजाला व्हावी आणि त्यापासून सर्वांना प्रेरणा व स्फूर्ती मिळावी या उद्देशाने तसेच त्यांच्या प्रती सन्मान ,आदर ,आणि प्रेम व्यक्त करण्याच्या भावनेने आमच्या शाळे जागतिक महिला दिन पंधरावडा अंतर्गत विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते.
 
इयत्ता १ ली ते ७ वी साठी मुलींसाठी वेशभूषा स्पर्धा व मुलांसाठी कर्तबगार स्त्रियांविषयी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते . त्याचप्रमाणे रांगोळी ,चित्रकला, निबंधलेखन,व एकपात्री अभिनय अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .सदर उपक्रमांची प्रथम फेरी घेण्यात आली. उत्कृष्ट सादरीकरण करणारे निवडक विद्यार्थी प्रथम फेरीतून निवडण्यात आले व इतर उपक्रमांचे फोटो स्वरुपात संकलन करण्यात आले.
 
सोमवार दि. o८ / ०३ / २०२१ रोजी व इयत्तां १ ली ते ७वी च्या निवडक विद्यार्थ्यांना Google meet वर सहभागी करून इतर सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना सर्व Youtube live telecast करण्यात आले.यात विशेष म्हणजे सादरीकरणात विद्यार्थ्यांबरोबर ४ महिला शिक्षकांचादेखील सहभाग होता .त्याचबरोबर इतर उपक्रमांत सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे फोटो स्वरूपात संकलन करून व्हिडिओ स्वरुपात सादरीकरण करण्यात आले ..ह्या सर्व उपक्रमांत ३५० ते ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला .
 
सदर उपक्रम सन्माननीय मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा बेडसे  यांच्या मार्गदर्शनातून साकार झाला . कार्यक्रमाचे सूत्रधार म्हणून श्री.कैलास माळी यांनी काम पाहिले.सर्व शिक्षकांनी एकजुटीने या कार्यक्रमाची धुरा सांभाळली .विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट अशा वेशभूषेतून व अभिनयातून कार्यक्रमाची उंची वाढली.मा.मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा बेडसे  यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांचे खूप -खूप कौतुक केले. पालकांच्या मेहनतीलाही दाद दिली .त्याचप्रमाणे शिक्षकांनाही शा 'बासकीची थाप देऊन प्रेरणा दिली . सौ.मानसी पवार  यांनी राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, व सर्व विद्यार्थी व पालकांचे मन:पूर्वक आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
 
ती...ला गरज आहे शाबासकीची !
ती...ला गरज आहे प्रोत्साहनाची !
                                                                               ती....ला गरज आहे कुटूंबाची
ती...ला गरज आहेआपणा सर्वांची !
ती .....सुरक्षित तर देश सुरक्षित!