स्वामी विवेकानंद विष्णुनगर माध्यमिक शाळेतील पर्यवेक्षिका मा.सौ. नाईक बाई सेवानिवृत्त

Source :    Date :27-May-2021


Gayatri_1  H x

 

स्वामी विवेकानंद विष्णुनगर माध्यमिक शाळेतील पर्यवेक्षिका मा.सौ. नाईक बाई सेवानिवृत्त


1_1  H x W: 0 x 

1_1  H x W: 0 x 

    राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, विष्णुनगर माध्यमिक शाळेच्या विद्यार्थीप्रिय पर्यवेक्षिका माननीय सौ. गायत्री मिलिंद नाईक यांचा शुभेच्छा समारंभ ३०/०४/२०२ रोजी गुगल मीट वर ऑनलाईन पार पडला.

     कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वजण एकत्र येणे शक्य नसल्याने ऑनलाईन सेवानिवृत्ती शुभेच्छा समारंभाचे आयोजन केले गेले. राष्ट्रीय शिक्षण संस्थेचा,शाळेचा ऑनलाईन सेवानिवृत्तीचा दुसरा कार्यक्रम अतिशय सुनियोजितपणे पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे कार्यवाह माननीय डॉ. श्री. दीपकजी कुलकर्णी , सहकार्यवाह मा. श्री. उंटवाले सर, शालेय समितीचे अध्यक्ष माननीय डॉ. श्री. धर्माधिकारी सर, आजी-माजी संस्था पदाधिकारी, विष्णुनगर शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री. रायसिंग सर, विष्णुनगर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती बेडसे बाई , पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख माननीय सौ.मुरादे बाई, संस्थेच्या इतर शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, उत्सवमूर्ती माननीय सौ. गायत्री मिलिंद नाईक बाई व त्यांचे कुटुंबीय, हितचिंतक असे मिळून जवळजवळ ८५ लोक उपस्थित होते.

     प्रथेप्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात उत्सवमूर्ती माननीय नाईक बाई व त्यांचे कुटुंबीय यांनी दीपप्रज्वलनाने केली. सौ.दातार बाईंनी ईशस्तवन सादर केले. शाळेच्या वतीने सौ.गौरांगी जोशी बाई यांनी माननीय सौ. नाईक बाई व त्यांच्या कुटुंबीयांचे त्यांच्या घरी उपस्थित राहून पुष्पगुच्छ,श्रीफळ,साडी,ऒटी मानाचा आहेर देऊन प्रत्यक्ष स्वागत केले.

     शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील भावना व्हिडीओद्वारे आणि ग्रीटींग कार्डद्वारे व्यक्त करून बाईंना शुभेच्छा दिल्या.त्याचप्रकारे माजी विद्यार्थी अमेय टिळक यांनीही आपल्या भावना व्हिडीओद्वारे व्यक्त केल्या.

    अरुणोदय शाळेची विद्यार्थीनी तेजल पिंपळे हीने लेखी स्वरुपात शुभेच्छा पाठविल्या होत्या त्याचे वाचन अरुणोदय शाळेची माजी विद्यार्थीनी यॊगीता सोमनाथ यांनी केले.शिक्षकांच्या वतीने डॉ.श्री. पांचाळ सर यांनी नाईक बाई यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूविषयी माहीती सांगून त्यांनी सेवाकाळात केलेल्या कार्याविषयी अनुभव मांडले व शिक्षकांच्या वतीने भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विष्णुनगर शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री.रायसिंग सर यांनी अरुणोदय, विष्णुनगर,दत्तनगर,गोपाळनगर या चारही शाळेत बाईंनी केलेल्या कार्याचा,वेगवेगळ्या जबाबदाऱ्या कशा प्रकारे पार पाडल्या या गोष्टींचा आवर्जून उल्लेख करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

     अमेरिकेमध्ये असलेली त्यांची मुलगी डॉ. वैष्णवी यांनी सुद्धा आपल्या भावना ह्जारो किलोमीटरवरून व्यक्त केल्या. डॉ. वैष्णवीसमवेत सासरच्या मंडळीनी सुद्धा शुभेच्छा दिल्या. मा. श्री. मिलिंद नाईक यांनी सुद्धा आपल्या मनातील भावना व्यक्त करुन आपल्या अर्धागिनीच्या कार्याचा गौरव करुन शुभेच्छा दिल्या.

     राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सहकार्यवाह मा. उंटवाले सर यांनी सौ. नाईक बाई यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पर्यवेक्षिका म्हणून सौ. राजेश्री कैलास कांबळे यांनी पदभार सांभाळावा असे संस्थेच्या वतीने जाहीर केले.यानंतर शालेय समितीच्या सदस्या मा. मिना भिरुड मॅडम यांनी उत्सवमूर्ती आणि आदर्श शिक्षक प्राप्त मा. पर्यवेक्षिका सौ. नाईक बाई यांच्या कार्याचा गौरव करुन त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या .

     उत्सवमूर्तींचे मनोगत आगळ्यावेगळ्या स्वरुपात आजी-माजी विद्यार्थी यामिनी सोमण दत्तनगर, स्वप्निल जोशी विष्णुनगर, यॊगीता सोमनाथ अरुणोदय यांनी मुलाखत घेऊन विविध विषयांवर प्रश्न विचारून मनोगत जाणून घेतले.त्यामध्ये सर्वच विषयांवर अतिशय उत्तम प्रकारे चर्चा घडून आली.बाईंनी सुद्धा अतिशय समर्पकपणे आपल्य़ा अनुभवाची शिदोरी आपल्या आजी-माजी विद्यार्थ्यासमोर मोकळी केली.आपण व्हिडीओद्वारा ते पाहणारच आहोत.

     कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार सौ. शर्मिला मुठे यांनी मानले. या कार्यक्रमाचे संपूर्ण स्वरूप हेडगेवार सभागृहातील कार्यक्रमासारखेच होते. नेहमीच्या प्रथेप्रमाणे कार्यक्रमाची सांगता सौ.दातार बाईंनी म्हटलेल्या पसायदानाने झाली.

    राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे कार्यवाह माननीय डॉ. श्री. दीपकजी कुलकर्णी यांची कल्पना , विष्णुनगर शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री.रायसिंग सर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने प्रत्यक्षात कार्यक्रमाच्या रुपाने साकार केली. संस्थेच्या शाळांतील सर्व शिक्षक दूर असून सुद्धा एकत्र आहेत हे एकंदर कार्यक्रमाच्या आयोजन व नियोजनातून सिद्ध होत होते.

      पूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सविता मगर यांनी केले.उत्सवमूर्तीचा परीचय सौ. केतकी देशपांडे व सौ.रेखा गढरी यांनी करून दिला. तसेच कार्यक्रमात दाखवलेल्या व्हिडिओ क्लिप सौ.अर्चना मराठे व सौ. केतकी देशपांडे यांनी तयार केल्या होत्या. या व्हर्चुअल कार्यक्रमातल्या सर्व तांत्रिक बाबी श्री.सपकाळे सर यांनी हाताळल्या.

    कोरोनाचा काळ असूनही व्हर्च्युअल माध्यमाचा वापर करून हा कार्यक्रम अतिशय उत्तम रितीने साकार झाला.एकंदरीतच हा अप्रतिम कार्यक्रम ऐतिहासिकच झाला. भूतो न भविष्यती अशी प्रचिती आली.


1_1  H x W: 0 x 

ऑनलाईन संपूर्ण कार्यक्रम खाली व्हिडिओमध्ये आहे.