योगासनांच्या प्रात्यक्षिकांद्वारे केला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा : स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर (माध्यमिक) शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी सादर केली विविध योगासने.

Source :    Date :26-Jun-2021

योगासनांच्या प्रात्यक्षिकांद्वारे केला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा : (स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर माध्यमिक) शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी सादर केली विविध योगासने.

निर्धार नियमित योग करण्याचा

आज पासून जपा मंत्र निरोगी आयुष्याचा

1_1  H x W: 0 x 

     २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, विष्णुनगर (माध्यमिक) शाळेमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांनी आभासी प्रणालीद्वारे साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांनी अनुलोम विलोम, कपालभाती, भ्रस्त्रिका यांसारखे प्राणायाम, ओमकार तसेच सूर्यनमस्कार, पद्मासन, ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन असे योगासनांचे विविध प्रकार व्हिडिओद्वारे सादर केले. शिक्षकांनी देखील यावेळी सूर्यनमस्कारासह विविध योगासने सादर केली. विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व समजावण्यात आले.

योगाभ्यासामुळे मुलांना आनंदी, सकारात्मक आणि उत्साही राह्ण्याचे प्रशिक्षण मिळते. मन सहज एकाग्र होऊ लागल्यामुळे त्यांचा बौद्धिक विकास उत्तम होऊन शैक्षणिक प्रगती होते.

     योग हा व्यायामाचा एक असा प्रभावशाली प्रकार आहे ज्याच्या माध्यमातून केवळ शरीराच्या विविध अवयवांमधीलच नाही तर मन, शरीर आणि आत्मा यांच्यातील संतुलन राखले जाते. योगाभ्यासामुळे शारीरिक व्याधींबरोबरच मानसिक विकारांवरसुद्धा विजय मिळवता येऊ शकतो.

     “योग ही भारताच्या प्राचीन परंपरेची एक अमूल्य देणगी आहे.” योग हे मेंदू आणि शरीराच्या एकतेचं प्रतीक आहे. मनुष्य आणि प्रकृती यांच्यात सामंजस्य आहे; योग हा विचार, संयम आणि पूर्णत्व प्रदान करणारा आहे त्याचप्रमाणे प्रकृतीस्वास्थ्यासाठी आणि विश्वाच्या भल्यासाठी एक समग्र दृष्टिकोन प्रदान करणारा आहे.आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये तसेच कोव्हीडच्या विशेष परिस्थितीमध्ये आरोग्य व मनःशांती टिकवून ठेवण्याचा सुरक्षित आणि सोपा मार्ग म्हणजे योग.

योग असे जिथे

आरोग्य वसे तिथे