राष्ट्रीय शिक्षण संस्था स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर माध्यमिक शाळेतील दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी माजी विद्यार्थी संघातर्फे शनिवार २४ जुलै रोजी आभासी प्रणाली द्वारे करियर गायडन्सचा कार्यक्रम संपन्न

Source :    Date :26-Jul-2021

1_1  H x W: 0 xराष्ट्रीय शिक्षण संस्था स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर माध्यमिक शाळेतील दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी माजी विद्यार्थी संघातर्फे शनिवार २४ जुलै रोजी आभासी प्रणाली द्वारे करियर गायडन्सचा कार्यक्रम संपन्न
       स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर माध्यमिक शाळेतील माजी विद्यार्थी संघातर्फे दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी करियर गायडन्सचा कार्यक्रम शनिवार २४ जुलै रोजी आभासी प्रणाली द्वारे संपन्न झाला.
       या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी संघाच्या संस्थापिका माननीय श्रीमती कुमुद डोके मॅडम या उपस्थित होत्या. यावेळी प्रास्ताविकामध्ये त्यांनी माजी विद्यार्थी संघाकडून घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी श्री. राहुल जोगळेकर, सौ.वृषाली देशपांडे तसेच श्री. डॉ. अंकित संखे यांनी विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात मार्गदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रम गुगल मीट च्या सहाय्याने ऑनलाईन घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णुनगर शाळेच्या पर्यवेक्षिका माननीय सौ.राजश्री कांबळे मॅडम यांनी केले.तसेच आभार सौ. अनिता मंगोडेकर मॅडम यांनी मानले. कार्यक्रमासाठी तांत्रिक बाबी शाळेतील शिक्षक श्री. धनराज सपकाळे व श्री. संदीप भावे यांनी हाताळल्या.
कार्यक्रमाला दहावीचे सर्व विद्यार्थी, पालक, शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री. भोजराज रायसिंग सर हे उपस्थित होते.