दीप अमावस्या

Source :    Date :11-Aug-2021
 
 दीप अमावस्या
 

दीप _1  H x W:
 
दीप अमावस्या आषाढ अमावस्या म्हणजेच दिव्यांची अमावस्या!
या दिवशी घरातील दिव्यांना दूध व पाण्याने धुवून स्वच्छ केले जाते. या दिवशी सुवासिनी स्रिया घरातले दिवे घासून-पुसून एकत्र पाटावर मांडतात. पाटाभोवती सुंदर रांगोळ्या काढतात. हे दिवे प्रज्वलित करून आघाडा, दुर्वा व पिवळी फुले यांनी दिव्यांची पूजा केली जाते. पक्वान्नांचा नैवद्य दाखविला जातो.
या वेळी खालील प्रार्थना केली जाते. "दीप सुर्यग्निरूपसत्व । तेजसा तेज उत्तमम।। गृहान मत्कृता पूजा। सर्वकम प्रदो भाव।।। "हे दीपा ,तू सुर्यरूप व अग्निरूप आहेस! माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. या नंतर दिव्यांची कहाणी ऐकवली जाते.
आयुरारोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती होते असे म्हटले जाते. भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ असून येथील सण-समारंभाचे महत्व सर्वांगीण दृष्टया अनन्य साधारण आहे.आषाढ महिन्यात भरपूर पाऊस कोसळतो.सूर्याचे दर्शन होत नसल्यामुळे वातावरण बऱ्याच सुक्ष्म जीवांची निर्मिती होते.मानवाच्या आरोग्याला या जीवांपासून विविध आजारांची लागण होते. या दीप अमावस्येच्या निमित्ताने वातावरण उष्णता निर्माण होते.त्यामुळे हे सूक्ष्मजीव या उष्णतेमुळे नष्ट होतात. हा वैज्ञानिक दृष्टिकोन आमच्या विद्यार्थ्यामध्ये रुजवता येतो.
या हेतुने आमच्या राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित 'स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर प्राथमिक शाळेत दिनविशेषानुरूप विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद तरी शिक्षण थांबले नाही.
रविवार दि.८ऑगस्ट २०२१ रोजी 'दीप अमावस्येनिमित्त इ.१ ते ४ च्या वर्गांतील विद्यार्थ्यांचे घरातील दिव्यांची देवासमोर पाटावर आरास करून कुटुंबातील व्यक्तिसमवेत दीप पूजन तसेच  विविध  आकाराचे दिवे/समई कोणत्याही का दिव्याचे चित्र काढून रंगविणे .या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. इ.५ वी ते ७ वी  च्या विद्यार्थ्यांसाठी घरातील दिव्यांचे विविध आकार तयार करून या आकारांचे दीप पूजन करणे. या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यांतून काही निवडक चित्रे व फोटो यांचे संकलन केले गेले.
सदर उपक्रम शाळेच्या सन्माननीय मुख्या.श्रीमती सुनंदा बेडसे यांच्या मार्गदर्शनाखाली व सुनियोजनातून यशस्वी झाला. या प्रसंगी दीप अमावस्या यशस्वी केल्याबाबत श्रीमती बेडसे बाई यांनी मार्गदर्शक शिक्षक, सहभागी विद्यार्थी,सहकारी पालकांचे कौतुक केले.