'गुरूपौर्णिमा'.

Source :    Date :03-Aug-2021
 
 
gurupornima_1  
 
 
गुर्रूब्रह्मा गुरूर्विष्णु गुरूर्देवो महेश्वरा गुर्रूसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरूवे नमः
 
आषाढ शुद्ध पौर्णिमेला 'गुरूपौर्णिमा' साजरी केली जाते .गुरूपौर्णिमा हा गुरूंबद्दल आदर आणि समर्पण याचा सण. गुरूपौर्णिमेला 'व्यासपौर्णिमा' देखील म्हणतात .कारण आदिगुरू व्यासांचा हा जन्मदिवस .
'ओम नमोस्तुते व्यास,विशाल बुध्दे!' अशी प्रार्थना करून त्यांना प्रथम वंदन करण्याचा परंपरा आहे.
गुरू म्हणजे मार्गदर्शक आणि पौर्णिमा म्हणजे प्रकाश . गुरूकडून मिळालेल्या ज्ञानाने जीवन प्रकाशमय होते . कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर -सुबक मडके घडवतो, त्याप्रमाणे गुरू मानवरूपी व्यक्तिमत्त्वाला आपल्या संस्कारांनी सुजाण व आदर्श माणूस घडवितात. गुरूला वयाचे,जातीचे बंधन नसते . गुरूची थोरवी सांंगावी तेवढी कमीच आहे . ' गुरू थोर म्हणावा की देव थोर म्हणावा ? नमस्कार आधी कुणासी करावा ? मला वाटते की गुरू थोर आहे , तयाचिये योग रघुनाथ पाहे..... गुरूंकडून संपादन केलेल्या ज्ञानाप्रती गुरुंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सुदिन 'गुरूपौर्णिमा'.
 
भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ असून येथील सण-समारंभांचे महत्त्व सर्वांगीण दृष्ट्या अनन्यसाधारण आहे . त्याची जाण बालमनातच रूजविण्याच्या हेतूने आमच्या राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित ' स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर , प्राथमिक शाळेत दिनविशेषानुरूप विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे 'शाळा बंद तरी, शिक्षण थांबले नाही '. शुक्रवार, दि. २३जुलै२०२१रोजी आभासीप्रणालीच्या माध्यमातून 'गुरूपौर्णिमा' उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात विद्यार्थ्यांसाठी
इ.१ली/२री- 'गुरूवंदना' श्लोक पाठांतर करणे;
इ.३री/४थी- संस्कृतभाषेत ' श्रीगणेशस्तवन' पाठांतर करणे;
इ.५वी ते ७वी - 'माझ्या जीवनातील डिजीटल गुरू' विषयावर वक्तृत्व सादर करणे
या उपक्रमांचे आयोजन केले गेले . या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्तम सादरीकरण केले .त्यातून निवडक व्हिडिओंचे संकलन केले गेले .
 या उपक्रमाचे लेखन सौ. मीना भांगरे यांनी शब्दरूपात मांडलेत . सदर व्हिडीओ ची गुंफण इयत्ता १ ली व २री साठी सौ. सुजाता वारके  आणि इयत्ता ३ री व ४ थी साठी सौ .संगीता बुरुड यांनी केले . इयत्ता ५ वी  ते ७ वी च्या  व्हिडिओंची गुंफण  श्री . मंगेश पेडामकर यांनी केले. सदर व्हिडिओचे सुंदर चलचित्र खालीलप्रमाणे आहे   .
 सदर उपक्रम शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा बेडसे यांच्या मार्गदर्शनाखाली व सुनियोजनातून यशस्वी झाला . गुरूपौर्णिमेचा हा उत्सव यशस्वी केल्याबद्दल श्रीमती बेडसे बाई यांनी मार्गदर्शक शिक्षक ,सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व नेहमी सहकार्याची भूमिका बजावणाऱ्या पालकांचे सहृयतेने आभार व्यक्त केले .