लोकमान्य टिळक

Source :    Date :03-Aug-2021
"
 
 
lokmanya tilak_1 &nb
 
मनुष्य स्वभावतः कितीही चांगला असला तरी शिक्षणाने त्याच्या बुद्धीचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होत नाही," असे ज्वलंत विचार मांडणारे जहाल स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी, लेखक म्हणजे लोकमान्य टिळक. म्हणूनच त्यांना 'लोकमान्य' ही पदवी लोकांनीच बहाल केली.
एका खाजगी शाळेत गणित शिक्षक म्हणून टिळकांनी ज्ञानदानाचे कार्य सुरू केले. टिळकांनी मराठी शिक्षणाचे महत्त्व ओळखून गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी १८८० रोजी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यासमवेत न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. १८८१ मध्ये लोकजागृतीसाठी 'केसरी' व 'मराठा' ही वृत्तपत्रे सुरू केली. १८८४ मध्ये तेलम, दांडेकर यांच्या मदतीने टिळक-आगरकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या संस्थेतर्फे १८८५ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना केली, टिळक गणित व संस्कृत विषय शिकवत असत. लोकांनी एकत्र यावे म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले. आणि 'टिळक पर्वाचा' प्रारंभ झाला.
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील ह्या युगप्रवर्तक युगपुरुषाचे सामाजिक अन् शैक्षणिक योगदान काळाच्या पटावर आजही तितकेच तेजोमय आहे. रविवार रोजी १ ऑगस्ट ही त्यांची १०१ वी पुण्यतिथी...
लोकमान्य टिळकांचा जीवनपट उलगडला जावा, त्यांच्या विचारांचा वारसा लाभावा, त्यांच्या वाणीचा प्रत्यय यावा, 'स्वराज्य' संकल्पनेचा संस्कार आधुनिक पिढीसमोर जावा यासाठी आमच्या शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांसाठी टिळक पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. "शाळा बंद पण शिक्षण सुरू" ह्याला अनुसरून सर्व उपक्रम हे आभासी प्रणालीद्वारे घेण्यात आले. उपक्रमांचे स्वरूप खालीलप्रमाणे होते.

इयत्ता पहिली- ५ वाक्ये लिहिणे.
इयत्ता दुसरी- गोष्ट सांगणे.
इयत्ता तिसरी व चौथी- हस्ताक्षर लेखन.
 इयत्ता पाचवी ते सातवी: निबंध लेखन
विषय :लोकमान्य टिळकांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य
सर्वच स्पर्धा लोकमान्य टिळकांच्या जीवनचरित्राशी* निगडीत होत्या. जेणेकरून टिळकांचे चरित्र वाचून, अभ्यासून आमचे विद्यार्थी प्रेरित होतील. टिळकांना अभिप्रेत असलेल्या राष्ट्रनिर्मितीसाठी, राष्ट्र उन्नतीसाठी साह्यभूत ठरतील.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. सुनंदा बेडसे, सर्व शिक्षक, पालक, कर्मचारी आणि विद्यार्थी ह्या सर्वांनीच कुशल नियोजनाने स्पर्धा यशस्वी केली.
एक कहाणी जुनी पुराणी तरीही सर्वां आवडणारी; नव्हे प्रेरित करणारी...
जनामनांच्या स्मृति-श्रुतींवर कायम अधिराज्य गाजवणारी...