मतदान प्रक्रिया दि.५ ऑक्टोबर २०१९

Source :    Date :19-Oct-2019
 स्वामी विवेकानंद विद्यामंदिर , विष्णुनगर  प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी मतदान प्रक्रिया अनुभवली  
मतदान प्रक्रिया 
                   दि.५ ऑक्टोबर २०१९रोजी इयत्ता ७ वी अ ब क च्या तिन्ही वर्गातील वर्गप्रतिनिधी प्रत्यक्ष मतदान पद्धतीने निवडण्यात आला .सदर उपक्रमांतर्गत पूर्वतयारी म्हणून इयत्ता ६ वी च्या विद्यार्थ्यांना मतदान केंद्राध्यक्ष ,मतदान अधिकारी म्हणून प्रशिक्षण देण्यात आले त्याचप्रमाणे इयत्ता ७ वी च्या प्रत्येक वर्गातून ५_५ विद्यार्थी उमेदवार म्हणून निवडण्यात आले .त्यांना प्रचारासाठी मुबलक वेळ देण्यात आला त्यानंतर सौ.रेखा महाजन मॅडम यांनी उमेदवारांची चिन्हांकित मतपत्रिका तयार केली व दि.५ऑक्टोबर २०१९ रोजी हेडगेवार सभागृहात तीन मतदान केंद्र स्थापन करण्यात आले .मतदारांची यादी ,बोटाला शाई लावण्यासाठी मार्कर पेन ,मतदान चिठ्ठी, मतपत्रिका ,मतदान कक्ष,मतपेटी इ.सर्व साहित्याची तयारी करून मतदार रांगेत येऊन आपले नाव व आपले ओळखपत्र दाखवून प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत सहभागी झाला .मतदान अधिकारी १ मतदान अधिकारी २ मतदान अधिकारी ३ या सर्व प्रक्रिया पूर्ण करून मतदान कक्षात प्रवेश केल्यानंतर मतपत्रिकेवर शाळेचा शिक्का मारून आपले मतदान केले .तदनंतर मतपत्रिका मतपेटीत टाकल्या .सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर माननीय मुख्याध्यापिका श्रीमती बेडसे मॅडम यांनी मतपेटीतील मतपत्रिका उमेदवार निहाय मतपत्रिका मोजून निकाल जाहीर केला. व वर्गाचा प्रतिनिधी निवडण्यात निवडण्यात आला. .अशा प्रकारे लोकशाहीची माहिती प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेतून विद्यार्थ्यांना समजावून देण्यात आली .सदर उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला .या उपक्रमास मा. मुख्याध्यापिका श्रीमती बेडसे मॅडम सर्व शिक्षक वर्ग यांनी सहभाग घेतला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .सदर उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीची मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला गेला