स्वामी विवेकानंद विष्णुनगर, प्राथमिकचे सुयश

Source :    Date :19-Nov-2020


 स्वामी विवेकानंद विष्णुनग
स्वामी विवेकानंद विष्णुनगर, प्राथमिकचे सुयश
 

आत्मविकासासाठी कष्ट ही एक प्रेरक शक्ती आहे, जी माणसामधील गुणवत्ता शोधून त्याला यशाच्या शिखरावर विराजमान करते. अशा यशोनंदाचे अनंत क्षण आयुष्यात येतात की, त्यांची तुलना अन्य कशाशीच होऊ शकत नाही. अशी भावावस्था व्हावी असेच यश ऐन दिवाळीच्या उंबरठ्यावर शाळेतील विद्यार्थ्यांनी अपार कष्ट आणि मेहनतीच्या बळावर मिळवले आहे.

दिवाळीच्या गोवत्स द्वादशीच्या दिवशी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, विष्णुनगर प्राथमिक शाळा 'उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, फेब्रुवारी-२०२०' मध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या अभूतपूर्व यशाने उजळून निघाली.

शाळेतील सहा विद्यार्थीरूपी दिव्यांनी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आणि प्रकाशदिव्यांनी लख्ख झालेले हे दिवाळीचे विश्व अधिकच तेजोमय झाले.

 गुणवत्ता यादीत आलेल्या :

 

·        श्रेयस युवराज खोत (७९ वा)

·        अपूर्वा मिलिंद सराफ (१११ वी)

·        निहारिका निरंजन कोठावदे (११२ वी)

·        निर्मोह शेखर खुर्जेकर (३५० वा)

·        अद्वय संकेत बेहेरे (३५८ वा)

·        खुशाल भरत म्हसळकर (४७४ वा)

ह्या विद्यार्थ्यांच्या धवल यशात शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा बेडसे, सर्व मार्गदर्शक शिक्षक, कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी ह्या सर्वांचेच मोठे योगदान आहे.

त्याचबरोबर यामध्ये राष्ट्रीय शिक्षण संस्था आणि संस्था प्रतिनिधी श्री.प्रमोद उंटवाले डॉ. शरद धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने चालविण्यात आलेल्या स्कॅालरशिपच्या विशेष मार्गदर्शन वर्गाचे ही योगदान आहे.
 विद्यार्थ्यांच्या ह्या कामगिरीचे सर्वांकडूनच भरभरून कौतुक होत आहे.
 
 
 
      स्वामी विवेकानंद विष्णुनग                स्वामी विवेकानंद विष्णुनग         विद्यार्थ्यांच्या ह्या का
स्वामी विवेकानंद विष्णुनग             स्वामी विवेकानंद विष्णुनग           स्वामी विवेकानंद विष्णुनग