स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचाभारत भू च्या पराक्रमाला मुजरा अमुचा मानाचा

20 Aug 2021 20:42:15
 स्वातंत्र्याची ध्वजा फडकते 
सूर्य तळपतो प्रगतीचा
भारत भू च्या पराक्रमाला
 मुजरा अमुचा मानाचा 
 
१५ ऑगस्ट आपला स्वातंत्र्यदिन राष्ट्रीय सण यावर्षी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव स्वातंत्र्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणार्या अनेक ज्ञात अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करावे, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लागावी ,आदर्श नागरिकत्वाचा संस्कार आधुनिक पिढीसमोर यावा यासाठी आमच्या राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर प्राथमिक शाळेत स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले होते .
यंदाचा अमृत महोत्सव म्हणजे राष्ट्राचा जागरणाचा महोत्सव .
भारतीयांनी इंग्रजांशी लढून मिळवलेले स्वातंत्र्य भारताच्या एकविसाव्या पिढीपुढे अनेक संकटे आहेत. चीन, पाकिस्तान ,दहशतवाद, कोरोनाची महामारी या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी आपल्या या पिढीच्या मनात राष्ट्रीय एकात्मता, देशप्रेमाची भावना रुजवण्यासाठी मानस म्हणून खालील उपक्रमाचे आयोजन करण्यात आले .शाळा बंद शिक्षण सुरु याला अनुसरून सर्व उपक्रम आभासी प्रणालीद्वारे घेण्यात आले उपक्रमाचे स्वरूप इयत्तानिहाय खालीलप्रमाणे होते .
इयत्ता १ली - २री
राष्ट्रध्वजाचे चित्र काढून रंगवणे

 ३री-४थी~  शौर्यकथा सांगणे 

 ५वी~  देशभक्तीपर गीतगायन 

६वी~   शौर्यगाथा सांगणे


यंदाचा महोत्सव म्हणजे सुराज्याची स्वप्ने पूर्ण करण्याचा महोत्सव वैश्विक शांतीचा ,विकासाचा महोत्सव .
 
 उपक्रमात ८०% विद्यार्थ्यांचा सहभाग होता तेथील काही निवडक व्हिडिओज व फोटोज यांचे संकलन करण्यात आले. सर्वच स्पर्धा या स्वातंत्र्यदिनाचे निगडित होत्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील इतिहासातील वीरांची विद्यार्थ्यांमध्ये त्यागाची, शौर्याची ,जोपासना व्हावी बलिदानाची जाणीव व्हावी, विद्यार्थी देशप्रेमाने प्रेरित व्हावे, यासाठी शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा बेडसे यांच्या अचूक मार्गदर्शन व सुयोग्य नियोजन लाभले त्यांनी मार्गदर्शक शिक्षक ,सहभागी विद्यार्थी, व सहभागी पालकांचे कौतुक केले .

 
 
Powered By Sangraha 9.0